आज दहावीचा निकाल

सातारा – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली. शनिवार आठ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्यीा माहिती दिली आहे. उद्या दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येणार आहे. www.mahresult.nic.in ,
www.sscresult.mkcl.org , www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

गेल्या वर्षीही दहावीचा निकाल 8 जून रोजी लागला होता. मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते 22 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून 17 लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते.

दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्‌सऍपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होते. मात्र, आता बोर्डाकडून दाहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याने संभ्रम संपला आहे. गुणवंतांचे छायाचित्र “प्रभात’कडे पाठवा सातारा जिल्ह्यातील दहावीतील 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांची छायाचित्र दै. “प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी अशा गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले छायाचित्र व गुणपत्रिकेची प्रत दै. “प्रभात’च्या कार्यालयात (राधिका रोड) अथवा [email protected] या मेलवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.