धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच; पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

पुणे : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे खडकवासला धरणापाठोपाठ आता पानशेत धरणही 99 टक्के भरले आहे. त्यामुळे पानशेत धरणातून 2 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. तर खडकवासला धरणातून 16 हजार 200 क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. मुळा-मुठा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी झेड ब्रीजवर गर्दी केली आहे.

दरम्यान, पाणी सोडण्यात आल्यानं पुणे शहरातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांची गैरसोय होत आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.