बिचुकलेने नाकारले आरोप

आज सुनावणी शक्‍य
कारागृहातील मुक्कामात वाढ; आरोप निश्‍चिती,
सातारा  –
बिग बॉस फेम साताऱ्यातील कवी मनाचे नेते अभिजित बिचुकलेच्यावर बुधवारी (आज) न्यायालयात आरोप निश्‍चिती झाली. यावेळी न्यायालयाने बिचुकले यांना त्याच्यांवरील आरोपांची माहिती दिल्यानंतर त्यांनी कळंबा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोप मान्य नसल्याचे सांगितले.

अभिजित बिचुकले यांना सातारा पोलिसांनी थेट बिग बॉसच्या घरातूनच मागील आठवड्यात धनादेश न वठल्याप्रकरणी शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर धनादेश न वठल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला. मात्र, त्यांच्यावरील खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना न्यायालयाने तुरंगात ठेवण्याचे आदेश दिले होते.

तेव्हापासून काही दिवस जिल्हा रुग्णालय त्यानंतर कळंबा कारागृहात बिचुकले आहेत. दरम्यान, बिचुकले यांच्यावरील खंडणीचा गुन्हा मागे घेण्याची तयारी फिर्यादीने दाखवल्याने या प्रकरणात वेगळा ट्विस्ट निर्माण झाला होता. मात्र, न्यायालयाने बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिचुकले यांच्यावरील आरोप निश्‍चिती केली. बिचुकलेंनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारल्यानंतर त्या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी आरोप निश्‍चितीच्या जबाबावर बिचुकलेंची सही असणे गरजेचे असल्याने त्यावर सही घेण्यासाठी बिचुकेलेंचे वकील कोल्हापूरला रवाना झाले आहेत. त्या जबाबावर बिचुकलेंची सही तत्काळ मिळण्यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात विनंती अर्ज केला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली.

आज बुधवारी बिचुकलेंची सही मिळाली तर खंडणीप्रकरणाची सुनावणी गुरूवारपासून नियमित चालणार असल्याचे ऍड. धनावडे यांनी सांगितले. खंडणीप्रकरणात गुरूवारी फिर्यादी फिरोज पठाण यांची साक्ष होईल. त्यानंतर दोन साक्षीदारांच्या व तपासी अधिकाऱ्याची साक्ष झाल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे तुर्तास काही दिवस तरी बिचुकलेंचा मुक्काम कळंबा कारागृहातच असणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.