पिंपरी – सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘दै. प्रभात’ आणि श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या साहित्य, वस्तू संकलन शिबिराला रविवारी सुरुवात झाली. यानिमित्ताने दिलेल्या हाकेला साद देत शहराच्या विविध भागांतून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू सुपुर्द करत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पिंपरी चिंचवड येथील बेलदार समाजाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून खाण्यापिण्याच्या साहित्याचे 51 संच दै. प्रभातच्या पिंपरी-चिंचवड येथील विभागीय कार्यालयात सुपूर्द करण्यात आले.