मुंबई-पुणे महामार्ग आज दोन तासांसाठी वाहतूकीस बंद राहणार

मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज 2 तासांसाठी बंद ठेवण्यात येणा आहे. याठिकाणी रस्ते वाहतूक विकास महामंडळाकडून काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक दुपारी १२ ते २ यावेळेत बंद राहिल.

दरम्यान, या मार्गावरील वाहतूक वळवण्यात येणार असून वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.या महामार्गावर आज दुपारी १२ ते २ यावेळेत ओव्हरहेड गँट्रीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याकडे येणारी वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.