जयपूर पिंक पँथर्स वि. पाटणा पायरेट्स
स्थळ – पाटलीपुत्र क्रीडा संकुल,पाटणा
वेळ – रात्री 7.30 वाजता
पाटणा – घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा पाटणा पायरेट्स संघाला मिळणार असला तरी आतापर्यंत अपराजित्व राखणाऱ्या जयपूर पिंकपॅंथर्सशी त्यांची लढत होणार असल्यामुळे त्यांची कसोटीच असेल. प्रो कबड्डीमधील अन्य लढतीत बंगळुरू बुल्सचा बंगाल वॉरियर्सबरोबर सामना होणार आहे. हा सामनही रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे.
बंगळुरू बुल्स विरूध्द बंगाल वॉरियर्स
स्थळ – पाटलीपुत्र क्रीडा संकुल,पाटणा
वेळ – रात्री 8.30 वाजता
पाटलीपुत्र क्रीडा संकुलात हे सामने होणार असून या लढतींबाबत स्थानिक चाहत्यांमध्ये कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. जयपूरने आतापर्यंत तीनही सामने जिंकले असून संभाव्य विजेता म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या स्पर्धेतील पहिल्या मोसमात त्यांनी विजेतेपद मिळविले होते. त्याची पुनरावृत्ती करण्यात त्यांना अपयश आले असले तरी या मोसमात त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
पाटणा संघाकडेही अजिंक्यपदाची क्षमता असल्यामुळेच हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीने होईल. पाटणा संघास एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यापासून ते बोध घेतील अशी अपेक्षा आहे.
बंगळुरू व बंगाल या संघांनी प्रत्येकी तीन सामन्यांपैकी दोन लढती जिंकल्या आहेत. दोन्ही संघांकडून अपेक्षेइतका प्रभावी खेळ झालेला नाही. त्यांना अजून बरीच मोठी प्रगती करावी लागणार आहे. येथील लढतीत त्यांच्याकडून चांगला खेळ दिसेल अशी आशा आहे.
जयपूर पिंकपॅंथर्स
बलस्थाने-सातत्यपूर्ण कामगिरी,
उत्कृष्ट सांघिक कौशल्य
कच्चे दुवे – शेवटच्या क्षणी खेळावर नियंत्रण नाही,
पकडींमध्ये अक्षम्य चुका
बंगळुरू बुल्स
बलस्थाने-चांगला सांघिक समन्वय,
भक्कम बचावात्मक खेळ
कच्चे दुवे – चढायांवर नियंत्रणाचा अभाव,
पकडींमध्ये अक्षम्य चुका
पाटणा पायरेट्स
बलस्थाने-विजेतेपदाची क्षमता असलेला संघ,
सांघिक कौशल्यावरच हुकमत
कच्चे दुवे – चढायांमध्ये नकळत होणाऱ्या चुका,
महत्त्वाच्या क्षणी खेळावर नियंत्रणाचा अभाव
बंगाल वॉरियर्स
बलस्थाने-युवा व अनुभवी खेळाडूंचा समतोल,
सांघिक कौशल्यपूर्ण खेळ
कच्चे दुवे – चढायांमध्ये घिसडघाई,
पकडींमध्ये नकळत चुका
स्थळ – पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पाटणा
वेळ – रात्री 7-30 वा.
स्थळ – पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पाटणा
वेळ – रात्री 8-30 वा.