#Prokabaddi2019 : अपराजित्व राखण्यासाठी जयपूरची हरयाणापुढे कसोटी

यू पी योद्धापुढे यू मुंबाची बाजू बळकट

जयपूर पिंकपँथर्स विरूध्द हरयाणा स्टीलर्स
स्थळ – मुंबई
वेळ – रात्री 7-30 वा.

मुंबई – माजी विजेत्या जयपूर पिंकपॅंथर्स संघास प्रो कबड्डी लीग स्पर्धेत अपराजित्व राखण्यासाठी आज हरयाणा स्टीलर्सच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.तर घरच्या मैदानावर यु मुंबा संघास यू पी योद्धा संघावर मात करताना अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे.

एनएससीआय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत जयपूरने आतापर्यंत झालेले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यांच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दीपक हुडा व दीपक नरवाल यांच्यावर त्यांची भिस्त आहे.

यु मुंबा विरूध्द यु पी योध्दा
स्थळ – मुंबई
वेळ – रात्री 8-30 वा.

हरयाणाविरुद्ध त्यांचे पारडे जड मानले जात आहे. हरयाणाने पहिल्या लढतीत पुणेरी पलटणला हरविले असले तरी नंतरच्या सामन्यात त्यांना दबंग दिल्लीकडून दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. जयपूरला हरविण्यासाठी त्यांना सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे.

मुंबा संघाने आतापर्यंत चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत तर दोन लढतींमध्ये त्यांना हार मानावी लागली आहे. अर्थात त्यांचा प्रतिस्पर्धी यू पी योद्धा संघास अद्याप या स्पर्धेत खाते उघडता आलेले नाही.

जयपूर पिंकपॅंथर्स

बलस्थाने- लागोपाठ दोन्ही सामने जिंकल्यामुळे भक्कम आत्मविश्‍वास उत्कृष्ट सांघिक कौशल्य
कच्चे दुवे- पकडींवर नियंत्रण नाही चढायांबाबतही अक्षम्य चुका

यू मुंबा

बलस्थाने- अनुभवी खेळाडूंची मांदियाळी आक्रमक चढायाबाबत प्रभावी कामगिरी
कच्चे दुवे- शेवटच्या मिनिटांमध्ये घिसडघाई पकडींमध्ये नकळत होणाऱ्या चुका

हरयाणा स्टीलर्स

बलस्थाने- शारीरिक तंदुरुस्तीत वरचढ पल्लेदार चढाया करण्याबाबत माहीर
कच्चे दुवे- पकडींमध्ये खूपच चुका सांघिक कौशल्याचा अभाव

यू पी योद्धा

बलस्थाने- युवा खेळाडूंचा उत्साहवर्धक खेळ खोलवर चढायांबाबत माहीर
कच्चे दुवे- सांघिक कौशल्यात कमतरता जिंकण्याच्या ईर्षेचा अभाव

प्रो कबड्डी गुणतालिका –

( सामना जिंकणाऱ्या संघास 5 गुण दिले जातात. सामन्यात 7 किंवा त्यापेक्षा कमी गुणांनी पराभव झाल्यास पराभूत होणाऱ्या संघास एक गुण दिला जातो. बरोबरी झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 3 गुण दिले जातात)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)