मथुरा – अखिल भारतीय हिंदू महासभेने आज हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केल्यामुळे मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह संकुलात आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतरच श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही इदगाहच्या आसपासच्या भागात सतर्कता वाढवण्यात आली असून प्रत्येक कोपऱ्यावर पोलिसांची करडी नजर आहे.
हिंदू महासभेच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह परिसरासह संवेदनशील भागात फ्लॅग मार्च काढला. एवढेच नाही तर सिव्हिल आणि एलआययूमध्ये तैनात असलेल्या पोलिसांच्या माध्यमातून या भागावर नजर ठेवली जात आहे. ड्रोनद्वारेही संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे.