इम्तियाज अली दिग्दर्शित “लव्ह आज कल 2’ने रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवशी 12 कोटी रुपयांचा धंदा केला आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या जोडीला पडद्यावर बघण्यास प्रेक्षक उत्सुक असल्याचे यातून दिसले. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रिलीज झाल्याचा फायदाही सिनेमाला मिळाला.
बॉक्स ऑफिसवर बऱ्याच दिवसात रोमॅंटिक थीमवरच्या कथेला वाव मिळाला नव्हता. ती उणीव “लव्ह आज कल 2′ ने भरून काढली आहे. महानगरांमध्ये या सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला, पण कमी लोकसंख्येच्या शहरांमधील प्रेक्षकांनी या सिनेमाबाबत फारसा उत्साह दाखवला नाही. सुरुवात चांगली झाली असली, तरी बॉक्स ऑफिसवर अशीच रेटिंग कायम राहील की नाही, याबाबत शंका व्यक्त होते आहे.
गेल्या 4-5 दिवसांत भारतात जेमतेम 12 कोटी रुपयांची वसुली या सिनेमाच्या नावावर झाली आहे. एकाच वेळी दोन पिढ्यांची प्रेम कथा “लव्ह आज कल 2′ मध्ये आहे. रणदीप हुडा आणि नवोदित आरुषी शर्मा हे “लव्ह आज कल 2’चे मुख्य कलाकार आहेत. मात्र, सगळा फोकस कार्तिक आर्यन आणि सारा अली खानवरच आहे. त्यामुळे हा “लव्ह आज…’एवढाच मर्यादित राहिला “कल’ निघून गेला आहे.