व्याजदरवाढीचे युग 

स्टेट बॅंकेकडून मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ; लवकरच कर्जावरील व्याजदरातही वाढ होण्याची शक्‍यता 
मुंबई: भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने आपल्या काही मुदत ठेवीवरील व्याजदरात 30 जुलैपासून वाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात बॅंकेच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्‍यता आहे. त्याबरोबर स्टेट बॅंकेने हा निर्णय घेतल्यानंतर इतर बॅंकांही व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक आज सुरू झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण 1 ऑगस्ट रोजी जाहीर होणार असतानाच स्टेट बॅंकेने ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकही व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 
रिझर्व्ह बॅंकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार आताची व्याजदर वाढ सर्वसाधारण ठेवीदाराबरोबरच ज्येष्ठ नागरीकांच्या ठेवीलाही लागू होणार आहे. 1 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या 1 कोटी रुपयांच्या खालील ठेवीवर आता 0.05 ते 0.1 टक्‍क्‍यापर्यंत वाढ करण्यात आली आहे. स्टेट बॅंकेच्या रिकरिंग ठेवीवरील व्याजदर मुदत ठेवीइतकेच आहेत. त्यामुळे रिकरिंग ठेवीवरील व्याजदरातही 30 ऑगस्टपासून वाढ झाली आहे. याअगोदर स्टेट बॅंकेने 28 मे रोजी आपल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली होती. 
दरम्यान, बडोदा बॅंकेने चांगल्या नफ्याचा ताळेबंद जाहीर केला. त्यानंतर बॅंकांच्या शेअरच्या भावात आज चांगली वाढ झाली. सरकारी बॅंकेचे शेअर तर उसळलेच त्याचबरोबर खासगी बॅंकांच्या शेअरच्या भावातही वाढ झाली. याचा अर्थ आता गुंतवणूकदारांचा बॅंकावरील विश्‍वास वाढला असल्याचे समजले जात आहे. गेल्या पंधरवड्यात केंद्र सरकारने काही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना आठ हजार कोटी रुपयांची भांडवली मदत केली आहे. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)