देशभरात आज मुस्लीम महिला हक्‍क दिवस

नवी दिल्ली – तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू झाल्याचे स्मरण म्हणून, 1 ऑगस्ट 2021 हा दिवस देशभरात, “मुस्लीम महिला हक्क दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा करताना सांगितले की केंद्र सरकारने एक ऑगस्ट 2019 रोजी देशात

तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू केला होता. या कायद्यामुळे तिहेरी तलाक आता फौजदारी गुन्हा समजला जातो. कायदा लागू झाल्यापासून तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.