इंडिया आणि बांग्लादेश लीजेंड्स आज आमने सामने

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज बद्दल, जाणून घ्या एका क्लिकवर

रायपूर – आज (दि. ५) पुन्हा एकदा चाहत्यांना माजी दिग्गज खेळाडूंना मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण आज पासून रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला गेल्यावर्षीच प्रारंभ झाला होता. त्यापैकी चार सामने सुद्धा पार पडले होते. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. परंतु आज इंडिया लीजेंड्स आणि बांगलादेश लीजेंड्स यांच्यात होणार्‍या सामन्याने पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. चला तर या सामन्याबद्दल आणि स्पर्धेबद्दल जाणून घेऊया..

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज या स्पर्धेचा उद्देश हा आहे की, ट्राफिक नियमांबाबत जागरूकता पसरवणे. पुन्हा एकदा सुरू होत असलेल्या या स्पर्धेतील पहिला सामना इंडिया लीजेंड्स आणि बांग्लादेश लीजेंड्स यांच्यात होणार आहे आणि या दोन्ही संघाचे नेतृत्व अनुक्रमे सचिन तेंडुलकर आणि कमान मोहम्मद रफीक करणार आहेत.

इंडिया लीजेंड्स संघाबद्दल बोलायचे झाले तर हा संघ पूर्णपणे भक्कम आहे. कारण आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात मुंबई इंडियन्स या संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर याने केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. शिवाय इंडिया लीजेंड्स संघाची गोलंदाजी सुद्धा भक्कम आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केलेल्या खेळाडूंचा संघात समावेश आहे. तसेच फलंदाजी सुद्धा मजबूत आहे.

बांग्लादेश लीजेंड्स संघात सुद्धा एकापेक्षा एक  धुरंधर खेळाडूंचा भरणा आहे. परंतु या संघाकडे इंडिया लीजेंड्स संघा प्रमाणे तितका अनुभव नाही. कारण सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या खेळाडूंकडे आयपीएल आणि टी-20 चा अनुभव आहे.

कुठे खेळला जाणार हा सामना?
या स्पर्धेतील सर्वच सामने छत्तीसगड राज्यातील रायपूर शहरात खेळले जाणार आहे. त्यामुळे इंडिया लीजेंड्स आणि बांगलादेश लीजेंड्स यांच्यात होणारा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर आज (5 मार्च) पासून खेळला जाणार आहे. या मैदानावर आयपीएल आणि चॅम्पियन ट्रॉफीचे काही सामने खेळले गेले आहेत.

किती वाजता आणि  कुठे पाहता येणार?
भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना आणि या स्पर्धेतील इतर सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर या सामन्यांचे लाइव स्ट्रीमींग वूट आणि जिओ अॅपवर पाहता येणार आहे. तसेच या सामन्याचे लाइव प्रक्षेपण कलर्स सिनप्लेक्स आणि रिश्ते सिनेप्लेक्सवर केले जाणार आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेतील सहा संघ :
इंडिया लीजेंड्स, बांग्लादेश लीजेंड्स, दक्षिण अफ्रीका लीजेंड्स, वेस्टइंडिज लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स आणि इंग्लंड लीजेंड्स.

इंडिया लीजेंड्सचा प्लेईंग इलेव्हन यामधून असणार :
सचिन तेंडुलकर(कर्णधार) , वीरेंद्र सेहवाग , युवराज सिंग, मोहम्मद कैफ, यूसुफ पठाण, नमन ओझा, झहीर खान, प्रज्ञान ओझा, नोएल डेविड, मुनाफ पटेल, विनय कुमार, इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी.

बांग्लादेश लीजेंड्सचा प्लेईंग इलेव्हन यामधून असणार:
खलील महमूद, मोहम्मद शरीफ, मुशफिकुर रहमान, ए एन एम ममून उर रशीद, नफीस इकबाल, कमान मोहम्मद रफीक(कर्णधार), अब्दुर रज्जाक, खलील मशूद, हनन सरकार, जावेद उमर, रजीन सालेह, मेहराब हुसैन, आफताब अहमद आणि आलमगीर कबीर.

स्पर्धेचे वेळापत्रक :

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.