मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले. व्यवसायात बरकत होईल. ठरलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
वृषभ :मनोरंजनाकडे कल राहील. खर्च वाढेल. करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल.
मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. मानसन्मानाचे योग. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा.
सिंह : अडचणींवर मात कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.
कर्क : आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवे हितसंबंध निर्माण होतील. पाहुणे येतील. सुखासीन दिवस.
कन्या : कामात यश मिळेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. योग्य व्यक्तीशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील.
तूळ : बौद्धिक परिवर्तन घडेल. अनेक कामे मार्गी लागतील. आप्तेष्ट भेटतील. घरकामात वेळ जाईल.
वृश्चिक : कामाचा ताण वाढेल. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चिंता नाहीशी होईल. फायदा तुमचाच होईल.
धनू : कार्यात सहभागी व्हाल. पैशाची स्थिती समाधान देणारी आहे. आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल.
मकर : चांगली बातमी कळेल. उलाढाल वाढेल. महत्त्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल.
कुंभ : सुसंधी लाभेल. मनाप्रमाणे कामे होतील. वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.
मीन : निर्णय योग्य घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी गाठभेट.