माजी अर्थमंत्री अरुण जेटली दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल,प्रकृती स्थिर

नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यावरील उपचाराकरीता दिल्लीतील एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरूण जेटली यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता नियमित तपासणीकरिता रूग्णलयात आणले होते.

जेटली यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मागील अनेक दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता.

दरम्यान, लोकसभेच्या निकालानंतर 29 मे 2019 रोजी प्रकृतीच्या कारणामुळे नव्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची जबाबदारी देऊ नका, अशी विनंती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राव्दारे केली होती. यासंदर्भात नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र अरुण जेटली यांनी ट्‌विटरवर पोस्ट केले होते.

यामध्ये त्यांनी म्हटले होते की, मागील 18 महिन्यांपासून माझी प्रकृती खालावलेली आहे. अशा परिस्थितीत मी जबाबदारी पेलू शकणार नाही. त्यामुळे मला मंत्री बनवण्याबाबत कोणताही विचार करु नका.

Leave A Reply

Your email address will not be published.