Today Bank Holiday : सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर चौथ्या दिवशी २७ जानेवारी रोजी देखील बँका बंद असणार आहेत. आज बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप करणार आहे. परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक सेवांवर परिणाम होऊ शकतो. दुसरा शनिवार, रविवार आणि त्यानंतर आलेली सार्वजनिक सुट्टी अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज बँकांचे कामकाज पूर्वपदावर येईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे आज कामकाजाचा दिवस असूनही बँकांचे दरवाजे बंद राहणार आहेत. Today Bank Holiday : बँका का बंद आहेत? बँक युनियनची पाच दिवसांचा कामाचा आठवडा, पगारवाढ, पेन्शनशी संबंधित काही जुनी मागणी करण्यात आली आहे. सध्या बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी आहे, त्यामळे ही मागणी केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडे हा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक सेवांवर परिणाम MI vs RCB : नॅट सायव्हर-ब्रंटचा ऐतिहासिक ‘धडाका’! WPL मधील पहिल्या शतकासह मुंबईचा आरसीबीवर दिमाखदार विजय प्रशासनासोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी आज कामावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सलग चौथ्या दिवशी बँका बंद राहणार असून, चेक क्लिअरन्स आणि रोख व्यवहारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. Today Bank Holiday कोणत्या बँका राहणार बंद? देशभरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, नॅशनल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँकेचा समावेश आहे. काही शहरातील बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलन करणार आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Girish Mahajan post : “आंबेडकरी विचार आमच्या…” ; बाबासाहेबांचा उल्लेख टाळल्याने झालेल्या वादावर गिरीश महाजनांची पोस्ट चर्चेत! कोणत्या सेवा राहणार सुरू? तुम्ही नेट बँकिंग किंवा बँकांच्या अधिकृत मोबाईल अॅपद्वारे तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. गुगल पे, फोन पे सारख्या सेवा सुरळीत सुरू राहतील. सलग सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी ATM बंद राहू शकते, कारण जास्तीच्या गर्दीमुळे काही ठिकाणी पैसे संपण्याची शक्यता आहे. Today Bank Holiday हेही वाचा: Bhagat Singh Koshyari : पुरस्कार की जखमेवर मीठ? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच राजकारण तापलं; ‘या’ जुन्या वक्तव्यांचा भडका