नवी दिल्ली – आज 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दिल्लीतील शास्त्री भवनात हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये 23 नाॅन फिचर तर 31 फिचर चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांमुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा एप्रिलमध्ये होऊ शकली नव्हती. त्यामुळे आता 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी हा सोहळा 3 मे ला होतो.
यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आयुष्यमान खुराना (बधाई हो) आणि विकी कौशल (उरी: द सर्जिकल स्ट्राइक) यांची तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा किर्ती सुरेश (तेलुगू सिनेमा- महानती) हिला प्राप्त झाला आहे.
66th National film Awards 2018: Award for best actress goes to Keerthy Suresh for Mahanati.
— ANI (@ANI) August 9, 2019
हिंदी भाषेत श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधुन हा सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा तर मराठीमध्ये शिवाजी पाटील दिग्दर्शित भोंगा या चित्रपटास सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
66th National film Awards 2018: ‘Andhadhun’ directed by Sriram Raghavan gets the best Hindi film award. pic.twitter.com/57zJtNCie2
— ANI (@ANI) August 9, 2019
66 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार –
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा – अंधाधुन (दिग्दर्शक-श्रीराम राघवन)
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा – भोंगा (दिग्दर्शक-शिवाजी पाटील)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष्यमान खुराना (बधाई हो) आणि विकी कौशल (उरी: द सर्जिकल स्ट्राइक)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्ती सुरेश (तेलुगू सिनेमा- महानती)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सीकरी (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
सर्वोत्कृष्ट पार्श्व गायक- अरिजीत सिंह (पद्मावत- बिंते दिल)
सर्वोत्कृष्ट पार्श्व गायिका- बिंदू मालिनी (नाथीचरामी-कन्नड सिनेमा)
सर्वोत्कृष्ट अॅडॉप्टेड स्क्रीनप्ले- अंधाधुन
सर्वोत्कृष्ट संवाद- तारीख (बंगाली)
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम जिझायनर- इंद्राक्षी पटनायक, गौरांग शाह, अर्चना राव (तेलुगू सिनेमा- महानती)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर – पद्मावत (घुमर)
सर्वोत्कृष्ट म्यूजिक डायरेक्टर – संजय लीला भन्साळी (पद्मावत)
66th National film Awards 2018: Best Choreography Award goes to the film ‘Padmaavat’ for the song ‘Ghoomar’. #NationalFilmAwards pic.twitter.com/fK2a4ePpTO
— ANI (@ANI) August 9, 2019