#Video : मोटरस्पोर्ट्सच्या वर्ल्ड कपमध्ये ‘या’ भारतीय महिला खेळाडूने रचला इतिहास

मुंबई – ऐश्वर्या पिस्साय या भारतीय महिला खेळाडूने मोटरस्पोर्टस खेळातील एफ.आई.एम. (FIM) वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवित इतिहास रचला आहे. मोटार स्पोर्टस वर्ल्ड कप जिंकणारी ऐश्वर्या ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.

तिने सोमवारी हंगरी येथील वरपालोटामध्ये एफ.आई.एम. वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत विजय संपादित करीत हे विजेतेपद आपल्या नावे केले. ऐश्वर्याने दुबईमध्ये पहिल्या फेरीत विजय मिळवित बाजी मारली होती. तर पोर्तुगलमध्ये तीसरे, स्पेनमध्ये पाचवे आणि हंगेरीमध्ये चौथे स्थान मिळविले होते. 23 वर्षीय ऐश्वर्याने 65 गुणासह ही स्पर्धा पूर्ण केली. ती पोर्तुगलची स्पर्धक रीटा हिच्या चार अंकानी पुढे राहिली. आधीच्या टप्प्यात मिळवलेल्या गुणांच्या जोरावर ऐश्वर्यांनं बाजी मारली.

ऐश्वर्या ही बेंगळुरू येथे राहणारी आहे. विशेष म्हणजे ती दोन मोठ्या अपघातांमधून वाचली आहे. साल 2017 मध्ये झालेला अपघातामध्ये ती थोडक्यात वाचली आहे. तिचे काॅलरबोन तुटलं होतं. त्यांनतर तिचे आॅपरेशन झाले आणि काॅलरबोन जोडण्यासाठी स्टीलची प्लेट आणि 7 स्क्रू बसविण्यात आले होते. जवळपास दोन महिने रुग्णालयात रहावं लागलं होतं. एवढ्या मोठ्या अपघातानंर तिने स्वत:ला सावरत विश्वचषक स्पर्धेत फक्त सहभागच घेतला नाही तर त्या विश्वविजेतेपद मिळवीत इतिहास रचला आहे.

तिच्या या कामगिरीबदल सर्वच स्तरातून तिचे कौतूक होत आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनीदेखील ट्विट करत ऐश्वर्या पिस्साय हिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here