नगर -जिल्ह्यातील 875 रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर 790 रुग्णांची भर एकूण रुग्णसंख्येत पडली. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 35 हजार 644 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 87.69 टक्के झाले आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4341 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 148, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 223 आणि अँटिजेन चाचणीत 419 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 70, संगमनेर 3, पाथर्डी 4, नगर ग्रामीण 9, श्रीरामपूर 2, नेवासे 12, अकोले 17, राहुरी 1, शेवगाव 3, कोपरगाव 6, कर्जत 5, मिलिटरी हॉस्पिटल 15 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 223 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 77, संगमनेर 16, राहाता 15, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 26, श्रीरामपूर 18, नेवासे 15, श्रीगोंदा 3, पारनेर 18, अकोले 2, राहुरी 19, शेवगाव 2, कोपरगाव 1,
जामखेड 6 आणि कर्जत 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 419 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 17, संगमनेर 79, राहाता 27, पाथर्डी 48, नगर ग्रामीण 6, श्रीरामपूर 21, कॅन्टोन्मेंट 6, नेवासे 6, श्रीगोंदा 22, पारनेर 19, अकोले 41, राहुरी 18, शेवगाव 12, कोपरगाव 28, जामखेड 30 आणि कर्जत 39, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 875 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 222, संगमनेर 24,
राहाता 76, पाथर्डी 50, नगर ग्रा. 54, श्रीरामपूर 41, कॅन्टोन्मेंट 7, नेवासे 81, श्रीगोंदा 32, पारनेर 34, अकोले 46, राहुरी 43, शेवगाव 84, कोपरगाव 37, जामखेड 24, कर्जत 17, मिलिटरी हॉस्पिटल 3, अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या : 35,644
उपचार सुरू असलेले रुग्ण : 4,341
आजपर्यंतचे मृत्यू : 665
एकूण रुग्णसंख्या : 40,650