पुणे – शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी.नांदापुरकर यांनी सांगितले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नांदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
जिल्हा रुग्णालयात झालेल्या या बैठकित तंबाखू नियंत्रण कायदा व महत्वाची कलमे, तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी, जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथक कार्यवाही, जिल्ह्यात प्राप्त तक्रारीवरील कार्यवाही तसेच सर्व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त करण्यासाठी कार्यवाही आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयाचे विजय टिकोळे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वय अधकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, पुणे महानरपालिकेचे डॉ. विनोद जाधव, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे गणेश फुंदे आदी उपस्थित होते.