शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडवू : राज्यमंत्री कडू

पुणे – राज्यातील शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्‍न लवकर सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे प्रलंबित प्रश्‍नांबाबत गाऱ्हाणे मांडले.

यावेळी शिक्षकेतर संघटनेच्या वतीने संघटनेचे शिवाजी खांडेकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न कोतूळकर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत निवेदन दिले. कर्मचाऱ्यांचे स्थानिक प्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यात यावेत व तसा अहवाल लवकरात लवकर पाठविण्यात यावा अशा सूचना शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण संचालकांना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.