वजन कमी करण्यासाठी ‘ही’ भाजी ठरेल फायदेशीर

सध्या बाजारात वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारची औषध किंवा व्यायामाची साधन उपलब्ध आहेत. त्याचा वापर सर्रासपणे सर्वच जण करताना दिसत आहेत. मात्र, या गोष्टींच्या व्यतिरीक्‍तदेखील आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले वजन कमी करू शकतो. यासाठी कोणत्या औषधांचा किंवा डाएट फॉलो करण्याचा अट्टाहास करण्याची गरज नाही. काही पदार्थ खाल्ल्यानंतर वजन वाढत असा जो कयास लावतात तसेच काही पदार्थ खाल्यानंतर वजन कमी होऊ शकते असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर कदाचित तुमचा विश्‍वास बसणार नाही. परंतू, हे सत्य आहे.

बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. हीच भेंडी तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवते. अर्थात वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल.

ज्यांना आपल्या वजनाची चिंता रोज सतावते त्यांनी वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्‍य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे. तसेही लहान मुलांना डब्यामध्ये भेंडीची भाजी सोपे आणि त्यांना आवडणारे असते त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी फायदेशीर ठरते.

एवढेच नाही तर ज्यांना आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायची आहे त्यांनी भेंडी जेवढी खाल्ली तेवढी चांगलीच आहे. परंतू, भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात. त्यामुळे भेंडीचा उपयोग तुम्ही कसाही केला तरी ती तुमच्यासाठी फायदेशीरच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.