एसटी स्थानकांच्या सुरक्षेसाठी रक्षक नेमणार

महामंडळाचा निर्णय : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न

पुणे – राज्यातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था एसटी महामंडळ आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. महत्त्वाची स्थानके आणि डेपोंमध्ये राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत, विशेष म्हणजे संवेदनशील ठिकाणी सशस्र सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे.

गेल्याच आठवड्यात अलिबाग डेपोच्या अखत्यारित येत असलेल्या एका बसमध्ये सापडलेल्या आयईडी बॉम्ब सापडल्याचा प्रकार समोर आला. त्यानुसार सुरक्षारक्षक नेमण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुंबईत झालेल्या या बैठकीत निर्णय घेण्यात आला महामंडळाचे राज्यभरात 254 डेपो आहेत. या डेपोंच्या अखत्यारीत किमान 500 महत्वाची बसस्थानके आहेत. या बसस्थानकांवरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आणि बसेसची संख्या लक्षात घेता तेथील सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार या बसस्थानकांवर राज्य सुरक्षा मंडळाच्या सुरक्षारक्षकांचा 24 तास खडा पहारा असणार आहे. त्याशिवाय अन्य महत्वाच्या स्थानकांवर सशस्त्र सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असून त्यासंदर्भात तेथील प्रमुखांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.

सुरक्षा व्यवस्था वाढविणार
बसस्थानकांवरील सुरक्षा बळकट व्हावी आणि त्यामाध्यमातून प्रवाशांना सुरक्षित वाटावे या हेतूने महामंडळाने महत्वाच्या बसस्थानकांवर मेटल डिटेक्‍टर आणि गरज असेल त्याठिकाणी बॅग्ज स्कॅनर बसविले होते. मात्र, गेल्या काही वर्षांच्या कालावधीत ही यंत्रणा धूळखात पडली आहे. परंतु नुकत्याच झालेल्या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत, त्याशिवाय बस ताब्यात घेताना आणि डेपोत लावताना त्यांची तपासणी करण्याच्या सूचना वाहक आणि चालकांना देण्यात आल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)