तिरंगा बनवण्यासाठी ‘त्या’ने घरच विकले 

हैद्राबाद – तिरंगाप्रती प्रत्येक नागरिकांच्या मनात सन्मानाची भावना असते. परंतु, आंध्रप्रदेशमधील एका व्यक्तीच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दलची भावना एवढी तीव्र होती कि त्यासाठी त्याने आपले घरच विकले. या व्यक्तीचे नाव आर. सत्यनारायण असून ते व्यवसायाने विणकर आहेत.

सत्यनारायण यांना वेगळ्या पद्धतीने तिरंग्याला तयार करायचे होते. त्यांना कोणत्याही शिलाई शिवाय अथवा एकाच सलग कपड्यावरच तिरंगा तयार करायचा होता. यासाठी सत्यनारायण यांना साडेसहा लाख रुपयांची गरज होती. यामुळे त्यांनी आपले घरच विकले. आणि ४ वर्षाच्या अथक प्रयत्नांनी ८ x १२ फूट तिरंगा ध्वज तयार केला. एकाच कापडावर तिरंगा अद्यापपर्यंत एकदाही तयार करण्यात आला नसल्याचा दावा सत्यनारायण यांनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here