मुंबई – अमेरिकन सुपरस्टार किम कार्दशियन नेहमीच तिच्या उत्कृष्ट लूकमुळे चर्चेत असते. लाखो लोक किमला फॉलो करतात आणि तिच्यासारखे दिसू इच्छितात. किमसारखे होण्यासाठी मॉडेल जेनिफर पॅम्प्लोना हिने करोडो खर्च केले आहेत आणि आता तिला पुन्हा तिचा खरा चेहरा हवा आहे.
View this post on Instagram
जेनिफर पॅम्प्लोनावर 40 शस्त्रक्रिया झाल्या आहे. 29 वर्षीय जेनिफर पॅम्प्लोना ही मूळची ब्राझीलची आहे, पण आता ती दुबईत राहते. तिने गेली 12 वर्षे फक्त किम कार्दशियन सारखी दिसण्यासाठी बॉडी फिलर्स करण्यात घालवली आहेत. मॉडेलने 40 कॉस्मेटिक ऑपरेशन केले आहेत.
View this post on Instagram
मॉडेलने सांगितले की मी कार्दशियनसारखे दिसण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. कार्दशियनचा लूक पाहून मला खूप आनंद झाला. यातून मी भरपूर पैसा कमावला आणि आयुष्याचा आनंद लुटला, पण आता मला कळले की मी नेमकी कोण आहे? माझी ओळख काय आहे? ती म्हणाली, “आता मला स्वतःला आरशात बघावेसे वाटत नाही आणि जेव्हा लोक मला कार्दशियन म्हणतात तेव्हा मला त्यांचा राग येतो.
View this post on Instagram
रिपोर्ट्सनुसार, किमसारखे दिसण्यासाठी जेनिफरने 47778000 रुपये खर्च केले आहेत. 2010 मध्ये, जेव्हा ती 17 वर्षांची होती, तेव्हा तिच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली. यानंतर, तिने बट इम्प्लांट केले, चरबीचे इंजेक्शन घेतले, ओठ, गाल, नाक पूर्णपणे बदलले. हळूहळू, जेव्हा अनेक शस्त्रक्रिया झाल्या, तेव्हा लोक तिला किम कार्दशियनचा लुक लाइक म्हणू लागले, जे तिला अजिबात आवडत नव्हते.
View this post on Instagram
जेव्हा तिला या लूकचा त्रास होऊ लागला तेव्हा तिने आपला जुना लूक मिळवण्याचा निर्णय घेतला. जेनिफरला इस्तंबूलमध्ये एक डॉक्टर सापडला, ज्याचा दावा होता की तो तिला पूर्वीसारखा बनवेल. नाकावरची चरबी काढणे, चेहरा, घसा इत्यादी शस्त्रक्रिया एकाच वेळी केल्या ज्यासाठी तिला 95 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागला. चेहरा पूर्वीसारखा सुरळीत होत असताना तिला इन्फेक्शनही झाले, त्यानंतर 3 दिवस तिच्या चेहऱ्यावरून रक्तस्त्राव सुरू होते. मॉडेलने आता तिचा ऑपरेशननंतरचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिला ओळखणे कठीण जात आहे.