अमरनाथ यात्रा भाविकांना सोडावी लागणे हे संतापजनक -आदित्य ठाकरे

मुंबई : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्‍मीरमधील अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. तसेच यात्रेला जात असलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना माघारी परतण्याचे आदेश केंद्र सरकाने दिले. या निर्णयावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आणि पर्यटकांना अमरनाथ यात्रा सोडावी लागण्याचा निर्णय संतापजनक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकार आणि आपले लष्कर नक्कीच दहशतवाद्यांचा खात्मा करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेत मोठा घातपात केला जाण्याची शक्‍यता असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने शुक्रवारी दिल्यानंतर जम्मू आणि काश्‍मीर प्रशासनाने अमरनाथ यात्रा रद्द केली. यात्रेकरू तसेच पर्यटकांनी शक्‍य तितक्‍या तातडीने काश्‍मीर सोडावे, असे सूचनावजा आदेशही प्रशासनाने दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.