मुंबई: कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही. तरीही सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा कांगावा करायचा. त्यापेक्षा कोरोनाकडे लक्ष दिलं पाहिजे, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार पाडताय, असा आपणच कांगावा करायचा. त्याच विषयावर मुलाखती करायच्या आणि त्यावरच बोलायचं, जेणेकरुण खरी जी कोरोनाची लढाई आहे, कोरोनाचे जे प्रश्न आहेत ते दूर होतील, असा हा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की, त्यांनी कोरोनाकडे लक्ष दिलं पाहिजे.
कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नसून स्वत:च मारुन घ्यायचं आणि स्वत:च रडायचं, ही एक नवी पद्धत आहे. ही पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते, असे देखील फडणवीस म्हणाले.