या हिवाळ्यात बाळाची नाजूक त्वचा मऊ मुलायम राहण्यासाठी…

या हिवाळ्यात घ्या बाळाच्या त्वचेची सर्वोत्कृष्ट काळजी अतिशय कोरड्या अशा थंडीत हवा आपल्या बाळाच्या त्वचेसाठी खूपच कठोर अशी असू शकते आणि त्यामुळे त्वचेच्या समस्या जसे कोरडेपणा, कंड सूटणे आणि पुरळ यांसारख्या समस्या ही निर्माण होऊ लागतात. आपल्या बाळाच्या त्वचेला ओलावा देणे किती महत्त्वाचे आहे या विषयी पालकांशी संवाद साधणे गरजेचे असते.

हिवाळ्यात बाळांची त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे त्वचेला जास्त प्रमाणात ओलावा आणणे गरजेचे असते. कारण गरम हवेपेक्षा थंड हवेत कमी प्रमाणात ओलावा असतो. म्हणूनच त्वचेची देखभाल करतांना नैसर्गिक घटकांनी युक्त म्हणजेच पॅराबेन्स, अल्कोहोल, कृत्रिम रंग, मिनरल ऑईल्स, एसएलईज/एसएलईएस/एएलईएस किंवा थॅलेटमुक्त उत्पादने हिवाळ्यात बाळाच्या त्वचेवर लावणे महत्त्वाचे असते.

पालकांनी नेहमी ऍलोव्हेरा, बदामाचे तेल, ऑलिव्हचे तेल अशा नैसर्गिक घटकांचा वापर केलेल्या बेबी वॉशचा वापर केल्यास बाळाच्या त्वचेचा समतोल राखला जातो. पालकांनी नेहमी बाळाच्या त्वचेसाठी योग्य साबण वापरणे आवश्‍यक ठरते. दूध, बदामाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईलने युक्त साबणाचा वापर केल्यामुळे बाळाच्या कोरड्या त्वचेला आराम मिळण्यास मदत होते.

बाळाची आंघोळ झाल्यानंतर त्वचेला मॉईश्‍चराईज करणे हे खूपच महत्त्वाचे असते आणि त्यामुळे बाहारची त्वचा कोरडी होण्यापासून बचाव होतो. पालकांनीसुध्दा लिकोरिसयुक्त बेबी क्रीमचा वापर केल्याने बाळाच्या त्वचेच संरक्षण होऊन ती मऊ होण्यास मदत होते आणि ऑलिव्ह ऑईल मुळे त्वचेचे पोषण, संरक्षण होऊन ती मऊ होण्यास मदत होते.

बाळांचे डायपर्स या काळात अधिक वेळा बदलावे त्यामुळेसुध्दा इन्फेक्‍शन आणि पुरळ होऊ शकते. नेहमी मऊ वाईप्स ज्यामध्ये ऍलोव्हेरा आणि कमळ फूलाचे घटक असतील असे वाईप्स वापरावेत. त्यामुळे बाळाची नाजूक त्वचा ताजीतवानी होण्यास मदत होऊन ती मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते.

– डॉ. सुभाषिणी एन एस

Leave A Reply

Your email address will not be published.