खोटी आश्‍वासने देऊन सत्ता मिळविणे देशद्रोह

छगन भुजबळ यांची टीका

कोल्हापूर – खोटी आश्‍वासने देऊन सत्ता मिळविणे हा देशद्रोह आहे. शेतकरी कर्जजमाफी हा महाघोटाळाच आहे. हे सरकार निर्लज्ज आहे. पहारेकरी चोर आहे. राममंदिर कधी होणार, असे आरोप करणारे शिवसेनेचे उध्दव ठाकरे भाजपसोबतच जाऊन बसले. त्यामुळे खरया अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम ठाकरे यांनी केले आहे, असा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी जयसिंगपूर येथील आयोजित सभेत केला.

शेतकऱ्याबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. लोकांसाठी काम करणे त्यांची पध्दत आहे. त्यामुळे जात-पात पाहू नका. लढवय्या नेत्याचे काम पहा. अशा नेतृत्वाला बळ देण्याची गरज असून हातकणंगले लोकसभा मतदार संघातून राजू शेट्टी पुन्हा लोकसभेत पाठवा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले. खा. राजू शेट्टी म्हणाले, सत्तेचा वापर करुन लोकांच्या मनामध्ये भीती घालण्याचे काम भाजप-शिवसेनेची मंडळी करत आहेत. मतदारच त्यांचा समाचार घेणार आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील बेताल वक्तव्य करुन धमक्‍या देत आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल झालेला मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पाहिला तर यामध्ये या निवडणूकीत साम, दाम, दंड, भेद सारख्या नितीचा अवलंब करा, असे ते म्हणत असतील तर ही कसली लोकशाही. सत्तेचा वापर जर असा होत असेल तर पुढील काळात तुमच्या छाताडावर नाचायला मीच असणार आहे. जातीपातीचे राजकारण मी कधी केले नाही. काम बघून मला अजूनही लोकवर्गणी येत आहे, हीच माझ्या कामाची पोचपावती असल्याचे खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.

यावेळी ऑल इंडिया मुस्लीम सेलचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, कॉंग्रेसचे नेते गणपतराव पाटील, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, उपस्थित होते. भगवान काटे यांनी आभार मानले.

Ads

1 COMMENT

  1. जामिनावर बाहेर आहेत आणि तेही आजारपणाचा खोटे नाटक करत. कधी तरी आत जाणारच आहेत हे विद्रू नका कारण सर्वसामान्यांना हे समजते. तेव्हा थोबाड आवरा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)