आपण चेहऱ्याचे सौंदर्य जपतो; पण तळपायांचा तेवढा विचार करीत नाही. चेहऱ्या ऐवढेच तळपायालाही जपावे लागते. तळपायांची योग्य काळजी घ्यावी लागते. तळपायांच्या सौंदर्यासाठी अनेक उत्पादने प्रसिद्ध आहेत. मात्र घरच्या घरीही तुम्ही तळपायांचे सौंदर्य वाढवू शकता.
रात्री झोपण्याअगोदर तळपाय स्वच्छ करून काही मिनिटे गरम पाण्यात बूडवून ठेवावे. त्यानंतर कपड्याने कोरडे करून आवश्यकतेनुसार क्रिम लावावे. तळपायांची नियमित मालिश केली पाहिजे.
मालिश करण्यासाठी तेलाची निवड तळपायांच्या स्वरुपानुसार केली पाहिजे. कोरड्या त्वचेसाठी व्हॅसलिन आणि चंदन तेल मिसळून मालिश करावी. भेगा पडलेल्या तळपायांना सरसोचे तेल, व्हॅसलिन आणि लिंबू मिसळून मालिश करावी.
सकाळी आंघोळ करताना हलक्या हाताने तळपायांना रगडून स्वच्छ करावे आणि आंघोळीनंतर सरसोचे तेल लावावे. उंच हिल्सच्या चपला, सॅंडल आणि जोड्यांचा वापर कमी करावा. दररोज 15 ते 20 मिनिटे चपला न घालता गवतावर किंवा हलक्या मातीवर फिरावे. या साध्या टिप्समुळेही तुमच्या तळपायांचे सौंदर्य वाढेल.