बीडीपीमधील जमिनींवरील अनधिकृत बांधकाम पाडणार; खरेदी-विक्रीवर निर्बंध

पुणे – महापालिका हद्दीतील जैव विविधता क्षेत्रामध्ये (बीडीपी) असलेली अनधिकृत बांधकामे काढण्यात येणार असून, या जागांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी सातबारामध्येच तशी नोंद करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

जैव विविधतेचे रक्षण करण्यासाठी आणि एकूणच शहरातील पर्यावरणाचा आलेख उंचावण्याचे काम महापालिका आयुक्तांनी हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी “नेचर वॉक’ संकल्पनाही राबवली आहे. त्यादृष्टीने त्यांनी पर्यावरण विषयात कार्य करणाऱ्या संस्था, तज्ज्ञ मंडळी यांचीही बैठक घेतली आहे. तसेच आणखीही काही बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्‍का मारावा
बीडीपीतील जागांची आजही खरेदी-विक्री होत असते. खरेदी केल्यावर तेथे बांधकामही होते. त्यामुळे या सगळ्या सातबारांवर या जमिनी “हस्तांतरणाला निर्बंध’ असा शिक्‍का मारावा, जेणेकरून परवानगी घेतल्याशिवाय या जागांचे हस्तांतरण अथवा खरेदी-विक्री होणार नाही. हे शिक्के मारले तर किमान हस्तांतरण वाचेल, असे तिसरे पत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.