नवी दिल्ली, दि. 13- करोना लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार इतर कंपन्यांना कोव्हॅक्सिन बनविण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहे.आम्ही यासाठी तयार आहोत आणि ही लस बनविणाऱ्या कंपन्यांशीही चर्चा करीत आहोत, असे केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.
एका मुलाखतीत ते म्हणाले की, कोव्हॅक्सिन ही भारतात तयार केलेली लस आहे. त्यामुळे त्याच्या उत्पादनात एपीआयची कोणतीही समस्या नाही. या संशोधनात सहाय्यक कंपन्या गरजेनुसार त्याचा पुरवठा करण्यास सक्षम आहेत. ते म्हणाले की, कोणत्याही औषध किंवा लस उत्पादकाकडे त्यासाठी आवश्यक चौकट आणि संसाधने असतील तर त्यांनी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांना परवानगी देऊ.