TMC MLA Humayun Kabir । तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये नवीन बाबरी मशीद बांधण्याचा दावा केला आहे. हुमायून कबीर म्हणाले, “मुर्शिदाबाद भागातील बेलडांगा याठिकाणी नवीन बाबरी मशीद बांधली जाणार आहे”. ते म्हणाले, “बेलडंगा येथे बाबरी मशीद उभारण्याचे काम 6 डिसेंबर 2025 पूर्वी सुरू होईल.” असेही त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे बोलताना कबीर यांनी, “पश्चिम बंगालमध्ये 34 टक्के मुस्लिम आहेत. पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या भावना आणि त्यांचे डोके उंच ठेवून जगण्याची इच्छा आणि त्यांच्या हक्कांसाठी मला येथून एक प्रस्ताव ठेवायचा आहे. पैशाची कमतरता भासणार नाही. बेलडांगा येथे असे अनेक मदरसे आहेत. याशिवाय बहरामपूर परिसरात अनेक मदरसे आहेत. सर्व मदरशांचे अध्यक्ष आणि सचिवांचा समावेश करून 100 किंवा त्याहून अधिक लोकांचा बाबरी मशीद ट्रस्ट तयार केला जाईल. या ट्रस्टच्या वतीने 6 डिसेंबर 2025 च्या आत या बेलडांगा परिसरात दोन एकर जागेवर बाबरी मशीद उभारण्यात येणार आहे.
‘मी करोडो रुपये देईन’ TMC MLA Humayun Kabir ।
ते म्हणाले, बंगालचे मुस्लिम समोर येतील आणि संपूर्ण देशाला दाखवून देतील की, मुर्शिदाबादच्या बेलडांगा याठिकाणी पाडलेली बाबरी मशीद स्थापन झाली आहे. मी स्वतः एक कोटी रुपये देईन आणि मला सांगायचे आहे की 6 डिसेंबर 2025 पर्यंत बेलडांगा येथे बाबरी मशीद स्थापनेचे काम सुरू होईल.
सार्वत्रिक निवडणुकीत हुमायून कबीर वादात राहिले TMC MLA Humayun Kabir ।
हुमायून कबीर हे मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भरतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ममता बॅनर्जी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते मंत्रीही राहिले आहेत. 2011 मध्ये त्यांनी टीएमसीच्या तिकिटावर रेजीनगर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. नुकतेच हुमायून कबीर यांचे एक विधान वादात सापडले होते. त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले होते की, विजयी झाल्यानंतर दोन तासांत भाजप समर्थकांचे तुकडे करून भागीरथी नदीत फेकून देऊ. मुर्शिदाबादमधील हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि ते म्हणाले, मुर्शिदाबादच्या लोकसंख्येपैकी 70% मुस्लिम आहेत,”असे त्यांनी यावेळी सांगितले .