हाथरस प्रकरण : टीएमसीच्या नेत्यांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून धक्काबुकी

नवी दिल्ली – हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांना गुरुवारी दुपारी पोलिसांनी अडवले व अटक केली होती. अशातच टीएमसी नेत्यांसोबतही उत्तरप्रदेश पोलिसांनी असाच व्यवहार करण्यात आला.

टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हाथरसमध्ये पोहचले. परंतु, त्यांची पीडितेच्या गावात प्रवेश करण्यास रोखण्यात आले. यादरम्यान डेरेक ओ ब्रायन यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी ते खाली  कोसळले. यानंतर पोलीस आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला.

हाथरस प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी सरकारी अधिकारी आपल्यावर वारंवार दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी केली आहे.

दरम्यान, यापूर्वीच हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांना यमुना द्रुतगती महामार्गावर अटक करण्यात आली. त्यापूर्वी राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली आणि ते तोल जाऊन खाली पडलेही होते. आपल्यावर पोलिसांनी लाठीमार करून खाली पाडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांना आणि अन्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक करून नंतर थोड्यावेळाने सोडून देण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.