नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांच्या निवडणुकांचे रणनीतिकार अर्थात पोलिटीकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप भाजपाने ट्विट केल्यावर वाद निर्माण झाला आहे. या क्ल्पमध्ये खुद्द प्रशांत किशोर सांगताना दिसत आहेत की, तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) च्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगालमध्ये विद्यमान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय होणार आहे. कारण राज्यात मोदींविषयी अफाट लोकप्रियता वाढली आहे.
ट्वीटच्या मालिकेत भाजपचे ज्येष्ठ नेते अमित मालवीय यांनी शनिवारी प्रशांत किशोर यांच्या अनेक क्लिप्स शेअर केल्या आहेत ज्यात त्यांना काही पत्रकारांशी बंगाल निवडणुकीबाबत किशोर चर्चा चर्चा करतांना दिसत आहेत. क्लब हाऊसवरील जाहीर गप्पांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक रणनीतिकारांनी कबूल केले की टीएमसीच्या अंतर्गत सर्वेक्षणातही भाजप जिंकत आहे. मोठ्या संख्येने मतदान मोदींसाठीच होत आहे. मतांचे ध्रुवीकरण ही राज्यात एक वास्तविकता बनली आहे, राज्यातील 27 टक्के मतदान हे अनुसूचित जातींचे असून हे सर्व जण भाजपला मतदान करीत आहेत, असे ट्वीट मालवीय यांनी केले आहे.
In a public chat on Club House, Mamata Banerjee’s election strategist concedes that even in TMC’s internal surveys, BJP is winning.
The vote is for Modi, polarisation is a reality, the SCs (27% of WB’s population), Matuas are all voting for the BJP!
BJP has cadre on ground. pic.twitter.com/3ToYuvWfRm
— Amit Malviya (@amitmalviya) April 10, 2021
मालवीय यांनी सामायिक केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रशांत किशोर हे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत आणि देशभरात त्यांच्याभोवती एक वलय निर्माण झाले आहे. टीएमसीविरूद्ध राज्यात नाराजीचा सूर (अँटी-इनकम्बन्सी) असून आहे, भाजपाने केलेले मतांचे ध्रुवीकरण हे एक वास्तव बनले आहे.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना किशोर म्हणाले, मला आनंद आहे की भाजपाचे लोक माझ्या क्लबहाउसच्या गप्पांना शब्द किंवा त्यांच्या नेत्यांपेक्षा अधिक गंभीरपणे घेत आहेत. मात्र, या क्लिपमध्ये वाक्ये जोडून तोडून मांडली आहेत, असे दिसते.