मधुमेहींनो; शर्करा नियंत्रणासाठी रोज करा हे आसन

पाठीच्या कण्याची कार्यक्षमता व लवचिकताही वाढते

तीर्यक ताडासन हे ताडासनाची दंडस्थितीमधील प्रगत स्थिती दर्शवणारे आसन आहे. प्रथम ताठ सरळ उभे राहावे. पायात कमीत कमी अंतर घ्यावे. श्‍वास घेत दोन्ही हात बाजूने वरच्या दिशेला घ्यावेत. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफावीत. डावा दंड डाव्या कानाला व उजवा दंड उजव्या कानाला टेकून ठेवावा. श्‍वास सोडत कंबरेतून उजव्या बाजूला वाकावे. वाकल्यावर श्‍वसन संथ सुरू ठेवावे. जेवढा वेळ शक्‍य असेल तेवढा वेळ स्थिर राहावे. एकदा डाव्या बाजूने व एकदा उजव्या बाजूने असे दोन वेळा तीर्यक ताडासन करता येते.

आसन सोडताना श्‍वास घेत सावकाश सरळ व्हावे. हे अतिशय सोपे आसन आहे. यामध्ये पायाच्या घोट्यापासून हाताच्या बोटापर्यंतची बाजू ताणली जाते. तिथपर्यंत भरपूर ताण येतो. त्यामुळे त्या सर्व भागांतील स्नायू ताणले जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. पूर्ण शरीराचे रक्ताभिसरण सुधारते. आळस कमी होतो. ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांनी शंखप्रक्षालनक्रियेत करायवयाचे हे महत्वाचे आसन आहे. जवळ जवळ 30 ते 50 वेळा तीर्यक ताडासन केले जाते.

शंखप्रक्षालन क्रियेतील आसनांच्या सेटमधील हे एक आसन आहे. यामुळे शर्करा नियंत्रित व्हायला मदत होते. तसेच लहान मुलांची उंची वाढविण्यासाठी हे आसन नियमित करावे. स्थुलता निवारण करण्याच्या आसनातील तीर्यक ताडासन हे बराच वेळ टिकवण्याचे आसन योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावे. याच्या टिकवण्यामुळे पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते व कंबरेवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी हे असान उपयुक्त ठरते तसेच दमा, अपचन, आमवाताचा त्रास आदी व्याधींवर या आसनाचा निश्‍चित फायदा होतो.

फक्‍त हे आसन नियमित करायला हवे म्हणजेच त्यासाठी रोजचा सराव आवश्‍यक आहे. या आसनाने पाठीच्या कण्याची कार्यक्षमता व लवचिकताही वाढते तसेच पायदुखी, टाचदुखी, गुडघेदुखी, पायातून गोळे येणे यासारखे विकार कमी होतात. तीर्यक ताडासनाचा एरवी कालावधी आपण 30 सेकंदापर्यंत टिकवू शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.