नवी दिल्ली : उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचीच चर्चा सध्या देशभर होत आहे. फाटकी जीन्स घालणाऱ्या महिला आपल्या मुलांवर काय संस्कार देणार?, असे वादग्रस्त वक्तव्य रावत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. दरम्यान, त्यांच्यावर टीका झाल्यानंतरही सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. फोटोत तीरथ सिंह रावत यांच्या मुलीनेच फाटकी जीन्स घातल्याचं म्हटलं जात आहे.
Oops my gumboots are missing in this I guess I have a different book of sanskar #rippedjeans #RippedJeansTwitter pic.twitter.com/o2j0HMuA8i
— Chitrashi rawat (@Chitrashirawat) March 19, 2021
मुख्यमंत्र्याच्या मुलीनेच फाटलेली जीन्स परिधान केल्याचा दावा व्हायरल होणाऱ्या फोटोमधून करण्यात येत आहे. या फोटोतील मुलगी बॉलीवूड अभिनेत्री असून चक दे इंडिया या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे. सोशलवर व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत तिने एक ट्विट केले आहे की, “सध्या सोशल मीडियावर व्हायरल फोटोत मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांची मुलगी आहे असा दावा केला जात आहे. पण हे पूर्णपणे खोटं आहे. हे खरं आहे की माझ्या वडिलांचं नावही तीर्थ सिंह रावत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा गोंधळा उडाला आहे.
दरम्यान,सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचे म्हटले. “माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे,” असे रावत यांनी म्हटलं आहे.