मुंबई – मराठीतील दिग्ग्ज अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकरने अतंत्य कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिज मधील श्रियाच्या अभिनयला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. सर्वच स्तरातून तिचे चांगले कौतुक देखील करण्यात आले होते.
View this post on Instagram
नुकतंच श्रियाने इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले असून, आपल्या आगामी ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाची माहिती दिली आहे. श्रियाने फोटो शेअर करत लिहिले की, हाथी मेरे साथी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचा भाग बनून मी स्वतःला खूप नशीबवान मानते. असं तिने म्हंटल आहे. ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट तीन भाषेत प्रदर्शित होणार असून २६ मार्च ला हा चित्रपट प्रेकधकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान तिला पत्रकारांनी घराणेशाहीवरून प्रश्न विचारला असता, तिने यावर स्टारकिड असल्याचा मी कधीच फायदा घेतला नाही. असं म्हणत बिन्दास्त आपलं मत मांडले आहे.
तिने याबाबत सांगितले की,’खरेतर फार कमी लोकांना माहित होते की मी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरची मुलगी आहे. मात्र खूप लोकांना याबद्दल माहित नव्हते. मात्र जेव्हा त्यांना हे समजायचे तेव्हा ते जास्त खू व्हायचे. नेहमी लोक म्हणातात की स्टार किड्ससाठी खूप सोप्पे आहे आपले नाव बनवणे, पण माझ्या केसमध्ये असे नव्हते.’
View this post on Instagram
दरम्यान, वन्यजीव आणि माणसाच्यातल्या संघर्षाचाही या सिनेमात आढावा घेतलेला असेल, “हाथी मेरे साथी’ च्या हिंदी आवृत्तीमध्ये जोया हुसेन, श्रेया पिळगावकर, पारस अरोरा, अंकित समर आणि टिनू आनंद हे देखील असणार आहेत. नाव “हाथी मेरे साथी’ असल्यामुळे अर्थातच सिनेमात हत्तींबरोबरच्या सहासी दृश्यांचाही समावेश असेल. “हाथी मेरे साथी’ नावाचा राजेश खन्ना यांचा सिनेमा सुपरहिट झाला होता. पण नवीन “हाथी मेरे साथी’ हा त्या सिनेमाचा रिमेक असणार नाही. तर त्यामध्ये पूर्ण नवीन वेगळी गोष्ट बघायला मिळेल.