तिंरगी ज्युनियर महिला हाॅकी स्पर्धा : भारत-आॅस्ट्रेलिया सामना बरोबरीत

कॅनबेरा : भारतीय ज्युनियर महिला हाॅकी संघाने ज्युनियर गटाच्या तिंरगी हाॅकी मालिकेतील सामन्यात आॅस्ट्रेलियाला ‘१-१’ ने बरोबरीत रोखले. आॅस्ट्रेलिया संघाने २५ व्या मिनिटाला स्कोनेल कर्टनी हिने केलेल्या मैदानी गोलाच्या जोरावर १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र भारतीय संघाच्या गगनदीप कौरने ५२ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकव्दारे गोल करून १-१ अशी बरोबरी साधून दिली.

https://twitter.com/TheHockeyIndia/status/1202505047885529088?ref_src=twcamp%5Ecopy%7Ctwsrc%5Eandroid%7Ctwgr%5Ecopy%7Ctwcon%5E7090%7Ctwterm%5E3

भारतीय संघाने पहिल्या सत्रात आक्रमक सुरूवात केली होती. संघाला १० व्या मिनिटाला पहिला पेनल्टी काॅर्नर मिळाला होता, पण आॅस्ट्रेलियाच्या मजबूत डिफेंसने भारताचा हा प्रयत्न अयशस्वी ठरवला.

दुस-या सत्रात आॅस्ट्रेलिया संघाने गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले पण भारतीय संघाने ते फोल ठरवले. पण, स्कोनेल कर्टनी हिने २५ व्या मिनिटाला गोल करत आॅस्ट्रेलियाला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाने आक्रमक खेळ केला पण गोल करण्यात अपयश आले. मध्यतरांपर्यत आॅस्ट्रेलिया १-० ने आघाडीवरच होते.

तिस-या सत्रात आॅस्ट्रेलियाने आक्रमक खेळ करत पेनल्टी काॅर्नर मिळवला, पण भारताने त्यांचा गोल करण्याचा प्रयत्न फोल ठरवला. चौथ्या सत्रात भारताने खेळावर वर्चस्व राखले. भारतीय संघाला सत्राच्या सुरूवातीलाच पेनल्टी काॅर्नर मिळाला, पण त्याचे गोलात रूपांतर भारताला करता आले नाही. त्यानंतर ५२ व्या मिनिटीला परत एकदा भारताला पेनल्टी काॅर्नर मिळाला, त्यावेळी गगनदीप कौर हिने कोणतीही चूक न करता पेनल्टी काॅर्नरव्दारे गोल करत सामना ‘१-१’ ने बरोबरीत सोडवला.

Leave A Reply

Your email address will not be published.