हडपसर, दि. 11 (प्रतिनिधी) -भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त “सोना आई’ इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तर्फे तिरंगा रॅली भेकराईनगर येथे काढण्यात आली. रॅलीमध्ये “भारत माता की जय’, “वंदे मातरम्’, “विजयी विश्व तिरंगा प्यारा’, अशा आवेश पूर्ण घोषणा देण्यात आल्या.
शाळेचे संस्थापक मा.ए.एल. नरसिंग राव, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वृंद यांच्या उपस्थितीत भव्य रॅली पार पडली.