मुलाची परवड पाहून मन सुन्न; आईचा मृतदेह बाईकवर स्मशानात नेण्याची वेळ!

श्रीकाकुलम – रुग्णवाहिका किंवा शववाहिका न मिळाल्याने कुटुंबीयांनी मोटारसायकलवरून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात काल घडली. मरण पावलेली 50 वर्षीय महिला मांडासा गावातील होती.


या महिलेला करोनाची लक्षणे होती. त्यांनी तिची करोना चाचणी केली मात्र त्याचा निकाल येईपर्यंत त्यांची तब्येत ढासळली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. तोपर्यंत त्यांना करोना झाला आहे की नाही हे समजू शकले नव्हते. मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका किंवा अन्य वाहनांसाठी बरेच प्रयत्न केले.

खूप वेळ वाट पाहूनही वाहन अथवा रुग्णवाहिका मिळत नसल्याने कुटुंबीयांनी मोटारसायकलवरून मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. या महिलेचा मुलगा आणि जावयाने मोटारसायकलवरून मृतदेह गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी नेला. दरम्यान आंध्र प्रदेशात सोमवारी 9881 नवे बाधित सापडले. या राज्यात राविवारी 12 हजार 634 अशी विक्रमी बाधितांची नोंद झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.