Amitabh Bachchan | अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. त्यांच्या प्रोजेक्टबाबतचे अनेक अपडेट ते सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी केलेल्या एक ट्विटमुळे चाहते घाबरले होते. अनेकांनी नेमकं काय झालं आहे? त्यांची तब्येत व्यवस्थित आहे ना? अशी विचारणा देखील केली. मात्र आता अमिताभ बच्चन यांनी पुन्हा त्याच प्रकारचं ट्विट केलं आहे.
अमिताभ यांनी ‘आता जाण्याची वेळ आली आहे’ असं ट्विट केलं होतं. पण याचा अर्थ चाहत्यांना समजला नव्हता. आता त्यांनी या ट्वीटचा अर्थ सांगितला आहे. अमिताभ बच्चन यांनी १५ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, ‘जाण्याची वेळ आली आहे….झोपायला’. गेल्या ट्विटमध्ये अमिताभ यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हे चाहत्यांच्या लक्षात न आल्यामुळे गदारोळ झाला होता. त्यानंतर आता हे ट्विट शेअर करत अमिताभ बच्चन यांनी झोपायला जाण्याची वेळ आली आहे, असं सांगितले आहे. Amitabh Bachchan |
T 5287 – जाने का समय आ गया है …. सोने 😴
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 13, 2025
7 फेब्रुवारी रोजी केलेल्या पहिल्या ट्विटनंतर बिग बींनी पुन्हा 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री “जाण्याची इच्छा होती पण जाता आलं नाही” असंही म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी या ट्वीटवरील चर्चेनंतर मौन सोडले आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने ‘आम्ही घाबरलोच होतो, पूर्ण वाचल्यानंतर कळलं’ असे म्हंटले आहे. तर इतरांनी त्यांना शुभ रात्री म्हंटले आहे.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं तर, अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती 16’ होस्ट करत आहेत. मागील वर्षी ते रजनीकांत यांच्यासोबत ‘वेट्टियन’ चित्रपटात दिसले होते. याशिवाय ते .कल्की 2898 ADमध्ये देखील दिसले होते.