रावसाहेब दानवेंमुळे आत्महत्या करण्याची वेळ – हर्षवर्धन जाधवांचे गंभीर आरोप

आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याचा इशारा

औरंगाबाद – माझे सासरे रावसाहेब दानवे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यांनी माझ्याविरोधात ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावला. त्यांच्या त्रासामुळे मी अंतूर किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो, असे गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केले आहेत.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांचे सासरे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. तसेच अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी अपलोड केलेल्या यूट्युब व्हिडीओ म्हटले आहे की, तुम्हाला असे वाटत असेल की, हा खूप फडफड करतो. याला कुठेही धरू आणि कापून टाकू. तुमचे छक्के-पंजे असलेले सगळे व्हिडीओ मी काढले आहेत. मी ते व्हिडीओ वकिलांना पाठवले आहेत. तुम्ही काहीही वेडेवाकडे केले, तर मी जीव देईन आणि तुमचे व्हिडीओ व्हायरल होतील. त्यामुळे तुम्हीपण जगा आणि मलाही जगू द्या, असे म्हटले आहे.

मी विनम्रपणे विनंती करतो माझा पिच्छा सोडा. तुमच्या मुलीला मी माझा बंगला द्यायला तयार आहे. मी फक्‍त प्लॉट देणार नाही. कारण तो प्लॉट माझ्या आई-वडिलांचा आहे. तुम्ही तिथे निळे, पिवळे झेंडे लावणार आणि तमाशा करणार, हे मला माहिती आहे, अशी टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.