Dhananjay Munde | Jitendra Awhad : मुंब्य्रातील सभेमध्ये जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली आहे. चिन्ह आणि अजित पवार यांच्याबद्दल बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केल आहे. “अजित पवारांचा गट म्हणजे पाकीटमारांची टोळी”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चाहूल लागत आहे. मागच्या वेळेस जी राष्ट्रवादीमध्ये फुट पडली होती त्याच्यावर निशाणा साधत असताना जितेंद्र आव्हाडांनी जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, आव्हाडांच्या वक्तव्यावरुन मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही एकत्र असताना ज्यांना आधारस्तंभ मानत होतो, आता आम्ही त्यांना म्हणायचं का त्यांनी आमचा आधारस्तंभ चोरला?”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, ““जितेंद्र आव्हाड यांचे आजपर्यंतचे जे वक्तव्य ऐकले असते, आम्ही एकत्र असताना ज्यांना आधारस्तंभ मानत होतो, आता आम्ही त्यांना म्हणायचं का त्यांनी आमचा आधारस्तंभ चोरला?
एक लक्षात घ्या, कुणाची काय परिस्थिती, कोण कुणासोबत या सगळ्या गोष्टी आज बोलणं उचित नाही. कुणाला पाकिट चोरणं म्हणतात त्यांनी आज जे काही झालंय घडलंय, ते येणारा काळ सांगेल”, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय होते, पाहा….
आव्हाड म्हणाले की, ‘शरद पवार कधीच नरेंद्र मोदींपुढे झुकले नाहीत ना अमित शाह यांच्यापुढे आणि शरद पवारांना पाचव्या स्टेजचा कॅन्सर झाला आणि तरीही त्यांनी पक्षाला वाचवण्यासारखे काम केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणाचा होता? असा प्रश्न करत आव्हाड म्हणाले की, अजित पवार एक दिवस येतात आणि शरद पवारांना धक्के मारुन बाहेर काढतात आणि जाता जाता त्यांच्या हातातून घड्याळ देखील हिसकावून घेतलं आहे. पाकीटमारांची टोळी आहे ही.
हिम्मत होती मर्दाची औलाद असता तर अजित पवाराने पण अस ठरवलं असतं की शरद पवारांनी दुसरा चिन्ह निवडला मी पण कोणता तरी तिसरा चिन्ह निवडतो असं जर ते बोल्ले असते तर आम्ही त्यांना मर्द म्हणालो असतो. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.