पुणे – पाचवी ते आठवी इयत्तांच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील अभ्यासक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील “टिलीमिली’ या मालिकेत 15 मार्चपासून प्रदर्शित करण्यात येणार आहे.
एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनच्या वतीने “टिलीमिली नाटिका’ ही शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित मालिका प्रसारित करण्यात येत आहे. प्रत्येक इयत्तेसाठी दररोज दोन नाटिका याप्रमाणे 48 नाटिकांचा संच असून, सर्व इयत्तांचे एकूण 192 नाटिका सादर करण्यात येणार आहेत.
बालरंगभूमी क्षेत्रातील मार्गदर्शिका स्वाती उपाध्ये आणि त्यांच्या “प्रेरणा- एक कलामंच’ या टीममधील तज्ज्ञ सहकारी आणि बाल कलाकार या मालिकेच्या निर्मितीत सहभागी झाले आहेत.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर 15 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीत दररोज मालिका प्रसारित होणार आहे. वेळापत्रकानुसार एक तासात प्रत्येक इयत्तेसाठी 25 मिनिटांच्या दोन नाटिका सादर होणार असून त्यात 5 मिनिटांचे मध्यंतर असेल अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.
कालावधी 15 मार्च ते 10 एप्रिल
वेळ – इयत्ता
सकाळी 7.30 ते 8.30 – आठवी
सकाळी 9 ते 10 – सातवी
सकाळी 10 ते 11 सहावी
सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 – पाचवी