Uddhav Thackeray । महाविकास आघाडीने राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ २ ४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र हायकोर्टाकडून या बंदची परवानगी नाकारण्यात आली. मुंबई हायकोर्टात वकील गुणरत्न सदावर्तेसह इतरांनी बंदविरोधात याचिका दाखल केली होती.
यावर २ ३ ऑगस्टला सुनावणी पार पडली. या सुनावणीत हायकोर्टाकडून महाराष्ट्र बंदची परवानगी नाकारण्यात आली. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही जर कोणी तशा प्रकारचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.
यावर आता सर्वच पक्षांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी यांनीही पत्रकार परिषद घेत राज्यभर कला फित लावत आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. मी दोन तास आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले,’महाराष्ट्र बंद मागे घेत आहे पण राज्यभर काळ्या फिती लावत आंदोलन करणार आहे. महिला अत्याचारांच्या घटनांबाबत बोलतांना ते पुढे म्हणाले, बदलापूरच्या केसवर आता कोर्ट फास्ट ट्रॅक काय असतं ते दाखवेल अशी आशा आहे. काल कोर्टाने जे थोबडवलं ते मुख्यमंत्री आणि सरकारला चपराक नाही का. असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. आताही मी कौतुक करत आहे. न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक आहे. न्यायालय हे तत्परतेने हलू शकतं. तीच तत्परता त्यांनी ज्या कारणासाठी आंदोलन करणार होतो त्यावर दाखवली पाहिजे. आरोपींना शिक्षा सुनावली पाहिजे. सरकार नराधमांना पाठीशी घालवत आहे. उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. ते स्वतच्या विश्वात मश्गुल आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलन करणार आहोत. लोकांना जागरूक करत असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.