सासवड, (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी सासवड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय टिळेकर यांची निवड करण्यात आली असून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सासवड येथील पुरंदर काँग्रेस कमिटीत मंगळवारी (दि. 13) पुणे जिल्हा तसेच पुरंदर व दौंड तालुक्याच्या ओबीसी सेलच्या पदाधिकार्यांना निवडीची पत्र देण्यात आली. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी सागर जगताप तसेच सासवड शहर ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी नितीन राऊत,
सरचिटणीसपदी अमित कुंभार, दौंड तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी पोपट लकडे, पुरंदर तालुका ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी विनोद चौरे यांना निवडीची पत्र देऊन आमदार जगताप यांनी सत्कार केला. याप्रसंगी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा सुनिता कोलते,
माजी उपनगराध्यक्ष विजय वढणे, सुहास लांडगे, नंदूकाका जगताप संतोष खोपडे, दीपक म्हेत्रे, सागर जगताप, तुषार जगताप, आप्पा भांडवलकर, मोबीन बागवान, संदीप राऊत, नितीन भोंगळे उपस्थित होते.