TikTok स्टार ‘फन बकेट भार्गव’ला बलात्कार प्रकरणात अटक

नवी दिल्ली – फन बकेट भार्गव या नावाने प्रसिद्ध असलेल्या टिकटॉक स्टारला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. भार्गवने विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर आहे.

भार्गवचे मूळ नाव चिप्पाडा भार्गव असं आहे. त्याच्यावर फॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंध्र प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भार्गव ने पीडित मुलीचे टिकटॉक व्हिडिओ पाहून तिला प्रपोज केले होते. मात्र, या तरुणीने त्याच्या प्रेमाला धुडकावून लावले. आणि याचाच बदला म्ह्णून भार्गवने तुझे आक्षेपार्ह व्हिडिओ माझ्याकडे आहेत असं सांगून तिला ब्लॅकमेल केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेम काजल यांनी दिली.

पीडित मुलीच्या पालकांनी विशाखापट्टणममधल्या पेंढुर्ती पोलीस स्थानकात भार्गवविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. पीडिता चार महिन्यांची गरोदर असल्याचं समजल्यानंतर हा प्रकार तिच्या कुटुंबीयांपुढे उघड झाला. आता भार्गवला ३ मरेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि इतर सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहे.

चिप्पाडा भार्गवचे ओ माय गॉड गर्लसोबतचे त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत. ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत असतात. त्याचे भरपूर फॉलोवर्स आहेत. भार्गव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असायचा. त्याच्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट आणि लाईक्स पडायचे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.