Tiktok | शॉर्ट व्हिडिओ चायनीज अ‍ॅप ‘टिकटॉक’लाही आला पर्याय…

आतापर्यंत 1 लाखाहून अधिकवेळा झाले डाउनलोड!

Tiktok | भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर स्वदेशी अ‍ॅप्स लोकप्रिय होत आहेत. सध्या ट्विटरचा भारतीय पर्यायी ‘कू’ अ‍ॅप खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. आता शॉर्ट व्हिडिओ चायनीज अ‍ॅप ‘टिकटॉक’लाही पर्याय आला आहे. 

पुणे बेस्ड टेक स्टार्ट-अप धकधक प्रायव्हेट लिमिटेडने ‘धकधक- इंडिया के दिल की धडकन’ हा शॉर्ट व्हिडिओ ( Indian ‘Dhakdhak’ ) अ‍ॅप लॉन्च केला आहे. चिनी टिकटॉक ( Tiktok )अ‍ॅपवर भारतातील बंदीमुळे नाराज असलेल्या भारतीय कन्टेन्ट क्रिएटर्सना या नव्या अ‍ॅपमुळे दिलासा मिळाला आहे.

‘टिकटॉक’ ला उत्तम पर्याय :

‘धकधक’ अ‍ॅप टिक-टॉकसाठी उत्कृष्ट दर्जाचा पर्याय आहे आणि देशात आजपर्यंत 1 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केला गेला आहे. त्याच वेळी, 20 हजाराहून अधिक कन्टेन्ट क्रिएटर्सने त्यात आकर्षक आणि मनोरंजक शॉर्ट व्हिडिओ बनविले आहेत. ‘धकधक’ या अ‍ॅपचे एक वैशिष्ट्य म्हणजे कलाकार आणि कन्टेन्ट क्रिएटर्सना त्यांची प्रतिभा दर्शविण्यासाठी, करियर बनवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्यात हे अ‍ॅप उपयोगी ठरेल.

प्रगतीची संधी आणि कमाईसुद्धा :

अ‍ॅपच्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार कलाकार आणि कन्टेन्ट क्रिएटर्सना अल्पकाळाची प्रसिद्धी देण्याऐवजी त्यांना करियरची योग्य संधी, कायमस्वरूपी व्यासपीठ आणि कमाईदेखील करण्याची संधी मिळेल.

कार्यक्रमांसाठी कलाकार उपलब्ध :

अ‍ॅपनिर्मात्यांच्या दाव्यानुसार याद्वारे काही नवोदित कलाकार, मॉडेल्स अथवा स्टारना क्षेत्रीय ब्रँड आणि जाहिरातींना प्रोत्साहन देण्याची संधी मिळू शकते. याशिवाय मीडिया हाऊसच्या कार्यक्रम आणि इव्हेन्टसाठी कलाकार उपलब्ध करून देऊ शकतील. एकूणच याद्वारे ‘धकधक’ तार्‍यांसाठी एक मोठा व्यासपीठ तयार करायचा आहे जिथून त्यांना टीव्ही, कार्यक्रम, चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही संधी देखील मिळू शकेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.