अमेरिकेत #TikTok वरील बंदी उठवली…भारतातही TikTok पुन्हा येणार ?

वॉशिंग्टन – अमेरिकेचे लोकप्रिय सोशल मीडिया अॅप टीक-टॉक आणि वी-चॅटवर मागील वर्षी अमेरिकेने बंदी घातली  होती. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत अमेरिकेने या चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता .

१२ नोव्हेंबर २०२० ला टीक-टॉकवर अमेरिकेत आदेश जारी करत अमेरिकन अ‍ॅप स्टोअर्सवरुन काही अ‍ॅप काढून टाकण्याचे आदेश जारी केले होते. माजी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी टीक-टॉक  तसेच अमेरिकेमध्ये या कंपन्यांना व्यवसाय करु न देण्याचा निर्णय घेतलेला. आता मात्र या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टिकटॉक घातलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, अध्यादेशावर बायडन यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. तसेच त्यांनी चीनबरोबरच इतर राष्ट्रांकडून होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांसंदर्भातही एक आदेश जारी केला आहे. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान आणि संवाद यंत्रणेसंदर्भातील सुरक्षेचा आदेश बायडन यांनी पारित केलाय. या आदेशात राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी घालणारे आदेश रद्द केले आहेत.

या आदेशात  बायडन यांनी एक्झीक्युटीव्ह ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान जारी करण्यात आलेले आदेशांमध्ये बदल करुन अमेरिकन माहिती आणि तंत्रज्ञान तसेच सेवा पुरवठा यंत्रणेच्या सुरक्षा अधिक सक्षम करण्याचा निर्णय नवीन आदेशांनुसार घेण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले होते. यावेळी चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेत चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. या या महत्वपूर्ण निर्णयामुळे चीनला मोठे आर्थिक नुकसान झाले होते.  भारतात लोकप्रिय असणाऱ्या एकट्या TikTok ला तब्ब्ल 45 हजार कोटी रुपयांचा फटका बंदीच्या निर्णयामुळे बसला होता. मात्र अमेरिकेत  TikTok  वरील बंदी उठवल्यामुळे सध्या सोशलवर भारतातही बंदी उठवणार का असा प्रश्न चर्चेत आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.