“ओल्ड इज गोल्ड’ क्रिकेट असोसिएशनचा अनोखा उपक्रम

-दोन तपानंतर वरिष्ठ खेळाडूंची “बॅटिंग’
-97 खेळाडू मैदानात : “गेट टूगेदर’च्या निमित्ताने क्रिकेट स्पर्धा

वडगाव मावळ – नव्वदीच्या दशकात पुणे जिल्ह्यातील क्रिकेट मैदान गाजविणाऱ्या “शंभरी’हून अधिक खेळाडूंनी मैदानावर येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या अनोख्या स्पर्धेत 1992 च्या विश्‍वकरंडक भारतीय खेळाडूंची हुबेहुब जर्सी लक्षवेधी ठरली. मावळ तालुक्‍यात प्रथमच सर्व खेळाडूंनी “गेट टू गेदर’च्या निमित्ताने स्पर्धा भरविली. ओल्ड इज गोल्ड क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकाराने रंगतदार सामन्यांमध्ये सहा संघांनी सहभाग नोंदवत नशिब अजमावत दोन तपांनंतर “बॅटिंग’ केली.

वडगाव येथे ओल्ड इज गोल्ड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून वरिष्ठ खेळाडूंचे क्रिकेट संघाचे “गेट टू गेदर’ स्पर्धा घेण्यात आली. 1990 ते 1998 दरम्यान वडगाव शहरातील नामवंत खेळाडूंसाठी पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली. 22-24 वर्षांनंतर सर्व खेळाडू एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या “गेट टू गेदर’ स्पर्धेत एकूण 97 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत 1992 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने परिधान केलेली हुबेहूब जर्सी बनवण्यात आली हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

या गेट टू गेदर स्पर्धेचे उद्‌घाटन नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फ्रेंड्‌स क्‍लब, बुलंद मावळ, 11 हनुमान, विजयनगर, यंगस्टार, अजिंक्‍य या संघाचे सामने झाले. स्पर्धेची अंतिम फेरीत अजिंक्‍य विरूद्घ विजयनगर अशी लढत झाली. अंतिम सामन्यात अजिंक्‍य क्‍लबने ओल्ड इज गोल्ड फिरत्या करंडकावर आपले नाव कोरले. हा करंडक तीन वर्षे लागोपाठ विजयी होणाऱ्या संघाला हा करंडक देण्यात बहाल करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी वरिष्ठ खेळाडू म्हणून राजू कुलकर्णी, राजू सुर्वे, अविनाश चव्हाण, नामदेव घोलप, अशोक भिलारे, विजय काकडे, शैलेश ढोरे, यशवंत तांबे, अशोक ढोरे, संजय शिर्के, सुरेश ढोरे, सचिन जाधव, संतोष चव्हाण, मंगल दुबे, गिरीश झांबरे, ललित शहा, किरण कार्यकर्ते, गणेश गायकवाड यांनी सहभाग घेतला.

संयोजन संतोष खैरे, सचिन आफळे, महेश कुलकर्णी, विनय सुर्वे, संतोष वाघमारे, मनोज जाधव, आनंद बाफना यांनी केले. या स्पर्धेत पंच आणि छायाचित्रकार म्हणून अमोल ठोंबरे, लखन आंबेकर, प्रशांत जाचक यांनी काम पाहिले. समालोचक अभिजित भिडे, बाळासाहेब भोंडवे, रवींद्र काकडे यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश वहिले, अभय बवरे यांनी केले. रजनिश ढोरे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.